March 12, 2017

‘ट्यूबलाईट’मध्ये सलमानला आवाज देणार अर्जित !

Written by

arjit-sinh

arjit-sinh
सुलतान चित्रपटामुळे सलमान खान आणि अर्जित सिंह सुरु असलेले भांडण आपल्या समोर आले होते. या चित्रपटातील जग घुमिया हे गाणे सर्वात आधी अर्जितने गायले होते. मात्र सलमानच्या सांगण्यावरून हे गाणे काढण्यात आले होते. हे गाणे हटवल्यानंतर अर्जित नाराज झाला होता. यादरम्यान अर्जितने सोशलमिडीयाच्या माध्यमातून सलमानची अनेक वेळा माफी मागितली होती. हे गाणे काढून टाकण्यात येऊ नये यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले होते. पण शक्य झाले नाही. पण आता त्यांच्यामधील कोल्डवार संपुष्टात आले आहे. कबीर खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’मध्ये अर्जित सिंह सलमानसाठी पार्श्वगायन करणार आहे.

अर्जितने एका पुरस्कार सोहळ्यात सलमानची नाराजी ओढवून घेतली. खरेतर या सोहळ्यात अर्जितला बेस्ट सिंगरचा पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानने त्याला कसे वाटते असे विचारले होते. त्यावेळी गंमतीने त्याने, वेळ लागल्यामुळे झोप येत होती, असे म्हटले. आपले सूत्रसंचालन कंटाळवाणे होत आहे, असा अर्थ या बोलण्याचा सलमानने काढला. अर्जितवर नाराज झालेल्या सलमानने सुलतानमधील ‘जग घुमिया’ गाणेच काढून टाकले. त्याच्या ऐवजी हे गाणे राहत फतेह अली खानने गायिले. तेव्हापासून सलमान आणि अर्जित यांच्यात कोल्डवार सुरू झाले होते.

पण आता अर्जित ट्युबलाईटसाठी गाणार या बातमीमुळे त्यांच्यातील वादावर पडदा पडला असेच म्हणावे लागेल. पण जोपर्यंत ट्युबलाईट प्रदर्शित होत नाही आणि त्यात आपल्याला अर्जितचे गाणे ऐकायला मिळणार नाही तोवर ही बातमी पक्की समजायची नाही. कारण सलमान मियाँचा मुड कधी बदलेल याचा भरवसा नाही.

The post ‘ट्यूबलाईट’मध्ये सलमानला आवाज देणार अर्जित ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *