March 12, 2017

‘ट्युबलाइट’मध्ये झळकणार हर्षाली?

Written by

salman

salman
बॉलिवूडच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून बालकलाकार हर्षाली मल्होत्राने सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले होते. हर्षालीनेही अभिनेता सलमान खानने साकारलेल्या बजरंगी भाईजानच्या भूमिकेला साथ देत या चित्रपटामध्ये ‘मुन्नी’ची भूमिका साकारत रसिकांची दाद मिळवली होती. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशाचे काही श्रेय हर्षालीने साकारलेल्या निरागस व्यक्तिरेखेलाही दिले गेले आहे. पदार्पणातच हर्षालीने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली होती. त्यामुळे ती यापुढे कोणत्या चित्रपटात काम करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहीले होते. पण हर्षालीने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन केलेल्या एका फोटोमुळे या उत्सुकतेवरुन पडदा उठणार असेच वाटत आहे.

नुकताच हर्षालीने तिच्या फेसबुकवरुन अभिनेता सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर करत त्याखाली ‘सरप्राईज, सरप्राईज’ असे म्हणत हा फोटो पोस्ट केला आहे. सलमानसोबतचा तिचा हा फोटो पाहता ती त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा झळकणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे.
सध्या हर्षालीच्या या पोस्टची प्रचंड चर्चा असून त्याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात न आल्यामुळे या पोस्टचे गुपित गुलदस्त्यात आहे असेच म्हणावे लागेल. या चित्रपटामध्ये सलमान खान एका चिनी अभिनेत्रीसह झळकणार आहे.

The post ‘ट्युबलाइट’मध्ये झळकणार हर्षाली? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *