March 12, 2017

जेएनयूमध्ये पीएचडीच्या विद्यार्थीनीवर ‘सैराट’च्या बहाण्याने बलात्कार

Written by

rape

rape
नवी दिल्ली – वादग्रस्त जेएनयूमध्ये पीएचडीच्या २८ वर्षीय विद्यार्थीनीवर ‘सैराट’ चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसंतकुंज पोलीस ठाण्यात एका ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यावर पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्याचे नाव अनमोल रतन असे आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या पीडित तरुणीला ‘सैराट’ चित्रपट पाहायचा होता. त्यामुळे तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवर या चित्रपटाची सीडी कोणाकडे आहे का? अशी पोस्ट टाकली होती. त्यावर उत्तर म्हणून अनमोल रतन याने माझ्याकडे हा चित्रपट उपलब्ध असून तो पाहायला रुमवर ये आसा मेसेज तिला दिला. त्यानंतर ही पीडिता तो राहत असलेल्या ब्रम्हपूत्रा या वसतीगृहातील त्याच्या खोलीवर तो चित्रपट पाहण्यास गेली. त्यावेळी त्याने तिली शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला झाला प्रकार लक्षात आल्यानंतर तिने वसंतकुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

The post जेएनयूमध्ये पीएचडीच्या विद्यार्थीनीवर ‘सैराट’च्या बहाण्याने बलात्कार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *