March 12, 2017

जिगीशा हत्याप्रकरणी दोघांना मृत्यूदंड, एकाला जन्मठेप

Written by

jigisha-ghosh

jigisha-ghosh
नवी दिल्ली – जिगिशा हत्येप्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सनावण्यात आली असून एकाला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली आहे. सोमवारी या प्रकरणी दिल्लीतील साकेत न्यायालयाने रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तर, तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे तिसरा आरोपी बलजीत मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च २००९मध्ये आयटी प्रोफेशनल जिगिशा घोषला ऑफिसमधून घरी परतत असताना अपहरण करण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसांनंतर हरियाणाच्या सूरजकुंड येथे जिगीशाचा मृतदेह सापडला होता.

नोएडामधील एक बीपीओ हॅविटअसोसिएट्स येथे २८ वर्षांची जिगीशा घोष ऑपरेशनल मॅनेजर होती. १८ मार्च २००९रोजी जिगीशा ऑफिसमधून घरी परत येत होती. पहाटे ४ वाजता वसंत विहार परिसरात तिच्या घराबाहेरुन तिचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या ऑफिस कॅबने तिला तिथे सोडले होते. त्यानंतर आरोपींनी जिगिशाचे एटीएम आणि क्रेडिट कार्ड यूज करुन खरेदी केली होती. १८ मार्च रोजी अपहरण झालेल्या जिगीषाचा मृतदेह २१ मार्च रोजी सूरजकुंड येथे सापडला होता.

जिगीशा हत्येप्रकरणी आरोपींचा सुगावा सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला होता. तिच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डद्वारे आरोपींनी खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. सरोजनी नगर मार्केटमधून हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. न्यायालयातमध्ये तो मोठा पुरावा ठरला होता.

The post जिगीशा हत्याप्रकरणी दोघांना मृत्यूदंड, एकाला जन्मठेप appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *