March 12, 2017

जावडेकरांनी केली इतिहासाची एैशी की तैशी

Written by

prakash-javdekar

prakash-javdekar
छिंदवाडा : इतिहासाची देशाचे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीच जाहीर मोडतोड केल्याने, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
तिरंगा यात्रेसाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये गेलेल्या जावडेकर यांनी, पंडित नेहरु आणि सरदार पटेल यांचा शहीद असा उल्लेख केला. एवढेच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरु, पटेल हे फासावर लटकले असा उल्लेख जावडेकरांनी आपल्या भाषणात केला.

जावडेकरांनी तिरंगा यात्रेदरम्यान त्यांच्या भाषणात भगतसिंह, राजगुरुंसह अनेक राष्ट्रपुरुषांची नावे घेतली. मात्र या यादीत त्यांनी नेहरु, पटेलांचीही नाव घेतल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच भाषणात जावडेकरांनी सुभाषचंद्र बोस यांनाही शहीद संबोधले. एकीकडे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत अजूनही सरकारकडून चर्चेच्या फैरी झडत आहेत. नेताजींचा मृत्यू झाला की नाही हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र जावडेकरांनी त्यांना शहिद घोषित करून टाकले आहे.

ज्यांनी ब्रिटीशांना हाकलून भारत स्वातंत्र्य केला, त्या सर्वांना आम्ही सलाम करतो. अनेक वीर यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरु, भगतसिंह, राजगुरु हे सर्व फासावर लटकले. क्रांतीवीर सावरकरांसह अन्य महान स्वातंत्र्य सेनानींनी देशासाठी अनेक लाठ्या खाल्या, गोळ्या झेलल्या, अनेक जण जेलमध्ये गेले, फासावर लटकले.

The post जावडेकरांनी केली इतिहासाची एैशी की तैशी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *