March 12, 2017

चाकरमान्यांना खुशखबर; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

Written by

toll

toll
मुंबई- सरकारने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विशेष स्टिकर्स लावण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना वळवण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आला आहे. कोकणातील प्रमुख नेत्यांची मंत्रिमंडळासोबत बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने दिलेली ही मोठीच खुशखबर आहे. दरम्यान टोल माफीची ऐनवेळी मागणी करून काही लोक राजकारण करत आहेत. त्यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे. सण हा आनंद साजरा करण्यासाठी आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असा शब्दात त्यांनी ​कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता टीका केली.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर टोल माफी द्यावी अन्यथा मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर आंदोलन करू असा इशारा ​नितेश राणे यांनी दिला होता. त्यानंतर आता सरकारने टोल माफीचा निर्णय घेतला आहे. सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेण्याची गरज होती, हा निर्णय म्हणजे देर आए दुरुस्त आए, असल्याची प्रतिक्रिया आमदार राणे यांनी दिली आहे.

The post चाकरमान्यांना खुशखबर; गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *