March 12, 2017

घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Written by

bsf

bsf
श्रीनगर – सुरक्षा रक्षकांनी काश्मीरमधील तांगधार सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांचा कट उधळून लावत, तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.

याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांगधार सेक्टरमध्ये दोन दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौकीवर झालेल्या हल्ल्यामध्ये या दहशतवाद्यांचा समावेश होता. आज सकाळी पुन्हा एकदा त्यांनी आणखी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. लष्कराच्या जवानांनी त्यांचा हा कट उधळून लावत तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर त्यांच्याकडील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

The post घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *