March 12, 2017

गुजरात विधानसभा; काँग्रेसच्या ५० आमदारांचे निलंबन

Written by

gujrat-vidhansabha

gujrat-vidhansabha
गांधीनगर- गुजरात विधानसभेत उना येथे दलितांना मारहाण करण्याच्या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेसच्या पन्नास आमदारांना विधानसभेत निषेध नोंदवून कामकाजात व्यत्यय आणल्या प्रकरणी बाहेर काढण्यात आले आणि एक दिवसासाठी निलंबित केले आहे.

विधानसभेत आलेल्या २० सदस्यांनी आपल्या शरीराला बॅनर गुंडाळले होते. मान्सून सत्रातील शेवटचा दिवस असताना काँग्रेस आमदारांनी गोंधळ घातला. त्यांना अध्यक्ष रमनलाल व्होरा यांनी वारंवार सूचना दिल्या तरी देखील त्यांनी ऐकले नसल्यामुळे शेवटी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दलित मारहाण प्रकरणाचा विरोधी पक्षाकडून राजकीय फायदा उचलला जात असल्याचे सत्ताधारी पक्षाने म्हटले.

The post गुजरात विधानसभा; काँग्रेसच्या ५० आमदारांचे निलंबन appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *