March 12, 2017

गिनीज बुकमध्ये मोदींच्या सुटाला मिळालेल्या किंमतीची नोंद

Written by

modi1

modi1
नवी दिल्लीः गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिलेल्या सुटाला लिलावात मिळालेली किंमतीचा समावेश झाला आहे. मोदींना हा सूट सुरतचे व्यापारी लानजीभाई पटेल यांनी भेट म्हणून दिला होता.

मोदींचे पूर्ण नाव या सुटावर कोरण्यात आले होते. यावरुन पंतप्रधान मोदींवर अनेक स्तरातून टिकाही करण्यात आली होती. त्यानंतर या सूटाचा लिलाव करण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता. लिलावत या सूटाला तब्बल ४ कोटी ३१ लाख ३१ हजार ३११ रुपयांची किंमत मिळाली आहे. आतापर्यंत कोणत्याही सुटाला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे.

The post गिनीज बुकमध्ये मोदींच्या सुटाला मिळालेल्या किंमतीची नोंद appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *