March 12, 2017

गिनीज बुकचे प्रमाणपत्र परत करणार जय जवान मंडळ

Written by

jai-jawant

jai-jawant
मुंबई: अवघ्या दोन दिवसांवर कृष्णजन्माष्टमीचा सण येऊन ठेपलेला असताना, गोविंदा पथकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे.

गेल्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या मंडळाने सर्वाधिक मनोऱ्यांचा स्पेनचा २२ वर्षांचा विक्रम मोडीत काढला होता. दहीहंडीच्या खेळासाठी लागणारी सर्व सुरक्षाव्यवस्था आपण पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे, या मंडळाचे म्हणणे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्वांमध्ये नाराजी पसरल्याचे गोविंदा पथकाचे म्हणणे आहे.

The post गिनीज बुकचे प्रमाणपत्र परत करणार जय जवान मंडळ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *