March 12, 2017

गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ‘बजाते रहो’

Written by

ganeshotava

ganeshotava
पुणे – जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शहरात गणेशोत्सवादरम्यान १०, ११, १२, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय कायम केला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान केला आहे. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, गणेश मंडळांनी १४ सप्टेंबरऐवजी १२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती मान्यही केली आहे.

१५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवसाच्या आधीची रात्र गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीची तयारी करावी लागते, तर १२ सप्टेंबर रोजी सोमवार असून, या दिवशी बकरी ईदची सुटी असल्यामुळे देखावे पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर १४ सप्टेंबरऐवजी १२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्याची मंडळांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली होती. तथापि, नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयानेच आक्षेप घेत हे अधिकार राज्य सरकारनेच वापरण्याचा निकाल दिला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संदिग्धता निर्माण झाली होती.

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त आदी उपस्थित होते. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला.

The post गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ‘बजाते रहो’ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *