March 12, 2017

खोतकरांच्या एसीबी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Written by

arjun-khotkare

arjun-khotkare
मुंबईः दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अजुर्न खोतकर यांनी ‘आप’ने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

या विनंतीवरुन मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गरज पडल्यास एसीबीमार्फतही खोतकरांच्या आरोपांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती या नात्याने ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांचा आहे. खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्याची मागणी केली.

The post खोतकरांच्या एसीबी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *