March 12, 2017

खेळावर आधारित चित्रपट करण्याची सोनाक्षीची इच्छा

Written by

sonakshi-sinha

sonakshi-sinha
महिला खेळाडूंच्या रिओ ऑलिम्पिकमधील यशाने साऱ्यांनाच भुरळ पाडली आहे. रिओ ऑलिम्पिकमधील महिला खेळाडूंच्या कामगिरीचे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींनीही कौतुक केले. या रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाही मागे नव्हती. ‘अकिरा’सारखा अॅक्शन चित्रपट केल्यानंतर तिने आता खेळावर आधारित चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तिने आपला मानस ‘सावधान इंडिया’या टीव्ही शोच्या सेटवर व्यक्त केला. मी शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. हॉलीबॉल, बास्केटबॉल, पोहणे, गोळाफेक, थाळीफेकसारखे क्रीडा प्रकार आवडतात. मी एक उत्तम खेळाडू असल्याचे ती यावेळी म्हणाली.

मला एखाद्या खेळावर आधारित जर चित्रपट करण्याची संधी कोणी दिली, तर तो मी करेन, अशी इच्छा तिने बोलून दाखवली. सध्या ती इतर खेळांच्या तुलनेत टेनिस आणि हॉलीबॉलला वेळ देत असल्याचे तिने यावेळी सांगितले. सोनाक्षीचा ‘अकिरा’ हा चित्रपट ‘मौना गुरु’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असून, हा चित्रपट २ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सध्या सोनाक्षी ‘नूर’ आणि ‘फोर्स २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

The post खेळावर आधारित चित्रपट करण्याची सोनाक्षीची इच्छा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *