March 12, 2017

खानावळीवर भारी पडला खिलाडी

Written by

akshay-kumar

akshay-kumar
बॉलिवूडमध्ये दबंग सलमान खान, किंग शाहरूख खान आणि आमीर खान या तिन खानांचेच चित्रपट हिट ठरतात असा बॉलिवडच्या चाहत्यांचा गैरसमज आहे. मात्र, या तिन्ही खानांना खिलाडी अक्षय कुमार भारी पडल्याचे चित्र आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात खिलाडी अक्षयच्या रूस्तमने धमाल केली. बॉक्स ऑफिसवर रूस्तमने आतापर्यंत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. एका वर्षात सलग ३ चित्रपटात १०० च्या वर गल्ला जमवणे हे आजवर तिनही खानांना जमले नाही. जे अक्षयने करून दाखवले आहे.

अक्षयच्या या कामगिरीमुळे त्याच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. दिग्दर्शक टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेला रूस्तम हा सत्यकथेवर आधारीत आहे. २०१६ हे साल अक्षयसाठी लकी असून, या वर्षातला अक्षयचा हा सलग तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय प्रमुख भुमिकेत दिसतो. या आधी आलेल्या हाऊसफल ३, एअर लिफ्ट या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या वर गल्ला कमावला आहे.

विशेष म्हणजे बॉलिवूडचे हुकमी एक्के समजल्या जाणाऱ्या तिन्ही खानांनाही अशा पद्धतीची कामगिरी जमली नाही. अक्षयचा यापूर्वीचा इतिहास पाहता प्रतिवर्षी अक्षयचे चार ते पाच चित्रपट येतात. त्यापैकी, किमान ३ चित्रपट तरी, चांगले यश कमावतात. मात्र, यांदाचे वर्ष अक्षयसाठी अत्यंत लकी ठरले असून, या वर्षात प्रदर्शित झालेला त्याचा एकही चित्रपट अपयशी ठरला नाही. या वर्षातील त्याच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता पर्यंत त्याच्या पाच चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमवला आहे. तर, रूस्तम हा त्याचा सहावा चित्रपट आहे.

अक्षय कुमार हा केवळ अभिनेता म्हणूनच गुणी नाही. तर, त्याचे सामाजिक भानही चांगले आहे. त्यांने दुष्काळी स्थितीत अनेक शेतकऱ्यांना मदत केली. इतकेच नव्हे तर, आत्महत्या केलेल्या अनेक कुटूंबांनाही त्यांने मदत केली. तो केवळ मदतीची घोषणा करून थांबला नाही. तर, मदतीचे चेक गरजूंच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत की नाही हेही पाहिले.

The post खानावळीवर भारी पडला खिलाडी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *