March 12, 2017

खलनायिका भूमिका जॅकलिनला साकारायची

Written by

Jacqueline-Fernandez

Jacqueline-Fernandez
खलनायिका भूमिका साकारण्याचे वेध आपल्या ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसला लागले असून ‘अल्लादीन’, ‘हाऊसफुल्ल २’, ‘किक’ आणि ‘ढीशूम’ सारख्या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांची वाहवा जॅकलिनने मिळवली आहे.

माझ्या या वर्षीच्या भूमिका ग्लॅमरस होत्या त्यामुळे व्हिलनची भूमिका करण्याची इच्छा आहे. मला आता व्हिलन सारख्या वेगळ्या भूमिका करायच्या असल्याचे जॅकलिन म्हणाली. ‘फ्लाईंग जट’ सारखे सुपरहिरोचे फँटसी चित्रपट आवडत असल्याचेही यावेळी बोलताना जॅकलिन म्हणाली. रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘फ्लाईंग जट’मध्ये टायगर श्रॉफ सुपरहिरोच्या भूमिकेत झळकणार आहे. हॉलिवूड अभिनेता नाथन जोन्स यात खलनायक साकारत आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. जॅकलिनने सहकलाकार टायगर श्रॉफला प्रोफेशनल कलाकार असल्याचे म्हटले आहे.

टायगरकडून मी खूप काही शिकले. तो प्रोफेशनल आणि टॅलेंटेड असल्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता, असे ती म्हणाली. जॅकलिनचा आदर्श अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रिओ हा हॉलिवूड अभिनेता आहे. भविष्यात त्याच्यासोबत काम करण्याचे तिचे स्वप्न आहे.

The post खलनायिका भूमिका जॅकलिनला साकारायची appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *