March 12, 2017

केंद्राकडून महाराष्ट्रात रल्वे विकासासाठी २० हजार कोटींचा निधी

Written by

manoj-sinha

manoj-sinha
नाशिक : केंद्राकडून सुमारे २० हजार कोटी रूपयांचा निधी महाराष्ट्रात रेल्वेचा विकास करण्यासाठी देण्याची तरतूद केल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. राज्यातील ११ रेल्वेमार्गांचा या निधीतून विकास करण्यात येईल असेही सिन्हा या वेळी म्हणाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील चौथ्या प्लॅटफॉर्मचे उदघाटन आणि अन्य विकास कामाच्या लोकार्पण सोहळा सिन्हा यांच्या हस्ते रविवारी पार पडला.

रेल्वेमंत्रालयाच्या धोरणाबाबत या वेळी बोलताना त्यांनी माहिती दिली. तसेच रेल्वे प्रवाशांची आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेची संख्या वाढली खरी. परंतु, त्या तुलनेत हवा तसा रेल्वेचा विकास झाला नाही, अशी खंतही सिन्हा यांनी या वेळी बोलून दाखवली. त्यामुळे हा विकास करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून, त्यासाठी केंद्र सरकारने सव्वा लाख कोटी रुपयांची रेल्वे विकासासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सिन्हा या वेळी म्हणाले.

महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राने विवीध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कोणत्याही राज्याच्या विकासात रेल्वे महत्वपूर्ण कामगिरी बजावते. त्यामुळे महाराष्ट्रातही रेल्वेचा विकास झाला पाहिजे, असे सांगत महाराष्ट्रात नवीन नाशिक पुणे रेल्वे मार्ग तसेच मनमाड-मालेगाव- इंदूर मार्गाचा तसेच मनमाड – दौड रेल्वे मार्गाचा विकास करण्यात येईल, असेही सिन्हा या वेळी म्हणाले.

या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार योगेश घोलप यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचा अनुशेष भरून काढत असल्याचे हंसराज अहिर यांनी यावेळी सांगितले.

The post केंद्राकडून महाराष्ट्रात रल्वे विकासासाठी २० हजार कोटींचा निधी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *