March 12, 2017

काजोलचा ‘दबंग ३’ला नकार

Written by

kajol

kajol
सलमान खानसोबत ‘प्यार किया तो डरना’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री काजोलने ‘दबंग ३’ ची ऑफर नाकारली आहे. सलमानच्या हिट ‘दबंग’चा तिसरा भाग बनणार आहे. यासाठी काजोलला ऑफर दिल्याचे सांगण्यात येते.

या चित्रपटाची कथा काजोललाआवडली नाही. यासाठी तिने ‘दबंग ३’ करण्यास नकार दिला. तिची व्यक्तीरेखा कुमकुवत असल्याचे सांगण्यात येते. एक नायिका म्हणून तिला फार महत्व नसल्याचे जाणवल्याने काजोलने नकार दिल्याचे सांगण्यात येते. ‘दबंग’च्या दोन्ही भागात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा चमकली होती. सोनाक्षीला ‘दबंग ३’ मध्ये सहभागी करुन घ्यायचे नाही असे निर्माता दिग्दर्शक अरबाज खानने ठरवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू आहे.

The post काजोलचा ‘दबंग ३’ला नकार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *