March 12, 2017

कांद्याच्या भावात ऐतिहासिक पडझड; ५ पैसे किलो कांदा

Written by

onion

onion
नाशिक : काही दिवसांपूर्वीच नऊ टन कांदा विकल्यार शेतकऱ्याला वघा एक रूपया मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याच प्रकारची घटना पिंपळगावच्या सायखेडा उपबाजार समितीत मंगळवारी पहायला मिळाली. सुधाकर दराडे नावाच्या शेतकऱ्याच्या कांद्याला येथील बाजारात चक्क ५ पैसे किलो म्हणजेच ५ रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

निफाड तालुक्य़ातील करंजगाव येथील सुधाकर दराडे हे शेतकरी आहेत. सायखेडा उपबाजार समिती कांदा मार्केटमध्ये सुमारे १३ क्विंटल कांदा दराडे यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याचा उत्पादन खर्च विचारात घेता तो ६०० ते ७०० रूपये इतका आहे. तसेच, उत्पादीत झालेला कांदा मार्केटमध्ये आणायचा तर, त्यासाठी वाहतूक आणि भराई हा खर्च प्रतिक्विंटल ६० रूपये इतका आहे.

कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चाच्या पटीत शेतमालास भाव मिळावा ही अपेक्षा असते. मात्र, दराडे यांच्या कांद्याचे मुल्यांकने केवळ ६५ रूपये झाले. मुळात त्यांना शेतातून बाजार समीती लिलावात कांदा आणण्यासाठी ७८० रूपये इतका खर्च आला होता. मात्र, बाजारात कांद्याला जो दर मिळाला तो पाहून दराडे यांचा अपेक्षा भंग झाला. या भयानक प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच संतापाची भावना निर्माण झाली असून, शेतकऱ्याची फरफट थांबणार कधी, असा सवाल शेतकऱ्यांकड़ून विचारला जात आहे. कांद्याला मिळालेला दर पाहून उद्विग्न झालेल्या सुधाकर दराडे यांनी कांदा न विकण्याचा निर्णय घेत तो तसाच परत आणला. दराडे इतक्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी परत आणलेला कांदा साठवून न ठेवात खत म्हणून सरळ आपल्या शेतात फेकून दिला.

दुष्काळ, गारपीठ, त्यातच बाजारसमित्यांनी पूकारलेला संप, आंदोलन अतिवृष्टी आदी घटना घडत असतानाही शेतकऱ्यांनी धीर न सोडता शेती केली आहे. शेतातील पीक पोटच्या पोरासारखी काळजी घेऊन पिकवले आहे. मात्र, त्यांच्या या कष्टाला, जीद्दीला बाजारात अगदी कवडीमोल दराची किंमत असल्या दिसत आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याचा कांदा विकत घेण्याची तयारी दर्शवली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, या तयारीचे पूढे काय झाले हे समजू शकले नाही.

घाऊक बाजारापेठेवरील दराकडे नजर टाकल्यास भाज्यांचे भाव अगदीच गगनाला भिडले आहेत. कोणतीही भाजी घ्यायची म्हटले तरी, त्या भाजीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कोणतीही भाजी ५० ते ६० रूपयांच्या खाली नाही. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्या इतक्या महाग आहेत. तर, त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मालाल भाव का मिळत नाही. हा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शेतीमालाच्या व्यापारात काही बडे ठेकेदार आणि व्यापारांनी संगनमत करून शेतमालाच्या दरांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोपही काही शेतकरी करतात. या मुद्द्यावर राज्य सरकारने लक्ष घालावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

The post कांद्याच्या भावात ऐतिहासिक पडझड; ५ पैसे किलो कांदा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *