March 12, 2017

कराचीत टीव्ही चॅनेलच्या कार्यालयाची तोडफोड, १ ठार

Written by

karachi

karachi
कराची – मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटच्या (एमक्यूएम) कार्यकर्त्यांनी एआरवाय टीव्हीच्या कार्यालयाची सरकारविरोधी केलेल्या उपोषणाला योग्य प्रसिद्धी दिली नाही, या कारणामुळे तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

एमक्यूएमचे सुमारे २ हजार कार्यकर्ते मदिना मॉलमध्ये असलेल्या या टीव्ही चॅनेलच्या कार्यालयात घुसले. तेथे जाळपोळ करत सर्व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या संघटनेने एआरवायसह नियो आणि सामा या न्यूज चॅनेलवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यांप्रकरणी सर्व स्तरातून निंदा केली जात आहे. पाकिस्तनाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हा फ्रिडम ऑफ प्रेस एक्सप्रेसनवर घाला घातल्याचे सांगितले. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पोलिासांनी या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एआरवाय टीव्हीचे मुख्य कार्यकारी मुराद अली यांनी या घटनेतील सूत्रधारांवर कडक करवाईची मागणी केली आहे.

The post कराचीत टीव्ही चॅनेलच्या कार्यालयाची तोडफोड, १ ठार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *