March 12, 2017

कन्फर्म ; गोलमाल ४मध्ये आलिया आणि दीपिका नाहीच

Written by

alia-bhatt

alia-bhatt
दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट दोघीही रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल ४’ मध्ये असणार नाहीत. या दोघी अजय देवगण भूमिका करीत असलेल्या या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेवर रोहितने पडदा टाकला आहे.

मला माहिती आहे की दोन तीन चित्रपटात काम करीत असल्यामुळे आलिया मोकळी नाही. त्यामुळे ती यात काम करणार नाही. ‘गोलमाल ४’ सारख्या चित्रपटात आलियाला काम करायचे होते, पण ते आता शक्य नाही. दीपिका देखील चित्रपट करीत आहे. तिच्यासोबत मला जर काम करायचे असेल तर ‘चेन्नई एक्सप्रेस’सारखा चित्रपट बनवावा लागेल, असे रोहित शेट्टी म्हणाला.

२०१३ साली दीपिका सोबत रोहितने ‘चेन्नई एक्सप्रेस’ दिग्दर्शित केला होता. यात शाहरुख खानचीही भूमिका होती. आम्ही नव्या अभिनेत्रींचा विचार करीत आहोत. पण त्याबद्दल आत्ताच काही सांगू शकणार नाही, असेही रोहित म्हणाला. ‘गोलमाल ४’ चे शूटींग पुढील वर्षी सुरू होणार असल्याचेही रोहितने सांगितले.

The post कन्फर्म ; गोलमाल ४मध्ये आलिया आणि दीपिका नाहीच appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *