March 12, 2017

एनडीआरएफची १० पथके पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल

Written by

ndrf

ndrf
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बिहार आणि उत्तरप्रदेशमधील पूरबाधित भागात मदत कार्यासाठी एनडीआरएफची १० पथके पाठविण्याचा निर्णय घेतला असून एनडीआरएफचे मुख्य संचालक ओ. पी. सिंग यासंबंधी माहिती देताना म्हणाले की, १० पैकी ५ पथके ओडिशा आणि उत्तरप्रदेशातील पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्याचे काम करणार आहे. तर भटिंडा आणि पंजाब येथून एकत्र केलेल्या दुसऱ्या ५ पथकाने बिहारमध्ये मदत कार्य करण्यास सुरुवात केली आहे.

ओ. पी. सिंग पुढे म्हणाले, की सकाळी लवकरात लवकर यातील पहिले पथक आपले मदतकार्य सुरू करणार असून त्यांच्याकडे बोट आणि आवश्यक ते लागणाऱ्या औषधांसह सर्व सामुग्री देण्यात आले आहे. तसेच अशी एकूण ५६ बचाव पथके या दोन राज्यातील तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, आणि उत्तराखंडमधील पूरबाधित नागरिकांच्य मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. तसेच या पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. त्या छावण्यावर सहाय्यक संचालक एस. एस. गुलेरिया(पटना) आणि आर. के. राणा (वारणासी) यांची प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिस्थीती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

एनडीआरएफच्या पथकाने काल बिहारमधील दिदारगंज येथून ३४०० नागरिक, बख्तियारपूरमधून ५८०, दानपूर ५४५, छप्रा येथून ३८०, वैशालीतून ३५५ आणि मनिर येथून १५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. आतापर्यंत एनडीआरफच्या पथकाने २६००० नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.

The post एनडीआरएफची १० पथके पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *