March 12, 2017

एक हजार कोटीचे कंत्राट तांत्रिक दुरुस्तीसाठी थांबवले- खडसे

Written by

eknath-khadse

eknath-khadse
जळगाव- राज्य शासनातर्फे राज्यात बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बाटलीवर होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट रद्द केल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत. पण ते कंत्राट रद्द केले नसून तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी उत्पादन शुल्कमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे यांनी उत्पादन शुल्कमंत्री असताना मद्याच्या बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी परवानाधारक मद्य प्राशन करणार्‍या व्यक्तीला आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होतो. मद्याचा काळाबाजार या माध्यमातून थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक ५ हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे. बनावट मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह आपण सुरुवातीपासून आग्रही आहोत.

मंत्रालयात त्यासंदर्भात दोन वेळा सादरीकरण करण्यात येऊन मंत्रीमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. हे कंत्राट देशस्तरावर आहे. आता जागतिक स्तरावर निविदा प्रसिद्ध करण्याबाबत तसेच या कंत्राटामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत त्या दूर करण्याबाबत शासनाचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मद्याच्या बाटलीवर होलोग्राम बसल्यामुळे बनावट दारूचा काळाबाजार बंद होऊन अनेकांना फटका बसणार असल्यामुळे या सार्‍यातून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे खडसे म्हणाले.

होलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. संबंधित ठेकेदाराने मागणीनुसार होलोग्राम तयार करून मद्यनिर्मिती करणार्‍या कंपनीला ते पुरवायचे आहे. त्या बदल्यात येणारा खर्च हा संबधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणार्‍या कंपनी मालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. या सार्‍यात शासनाचा एक रुपयाही निधी खर्च होणार नाही असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.

The post एक हजार कोटीचे कंत्राट तांत्रिक दुरुस्तीसाठी थांबवले- खडसे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *