March 12, 2017

एका भारतीयाची कल्पना चोरून मार्क झाला फेसबुकचा सर्वेसर्वा

Written by

combo

combo
आज जर का तुम्ही एखाद्या शाळकरी मुलाला जर विचारले कि फेसबुकचा संस्थापक कोण आहे? सहाजिकच त्याच्या तोंडून मार्क झुकेरबर्गचेच नाव येईल. पण यातील ब-याच लोकांना हे माहिती नाही की, फेसबुकचा खरा फाऊंडर हा एक अनिवासी भारतीय आहे. होय…हे खरे आहे…एका भारतीयाने फेसबुक बनवले होते.

याबाबत inextlive.jagran.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत २९ वर्षीय आणि भारतीय वंशाच्या दिव्य नरेंद्र याचा जन्म झाला. त्याचे आई-वडील त्याच्या जन्माआधीपासून अमेरिकेत राहत होते. त्यानंतर दिव्यचा जन्म न्यूयार्कमध्ये झाला. दिव्यचे पालक त्याला त्यांच्यासारखा डॉक्टर बनवणार होते. पण दिव्यचे स्वप्न वेगळे होते. त्याला काहीतरी वेगळ करायचे होते. त्याचे हे स्वप्नही पूर्ण झाले आणि तो फेसबुकचा फाऊंडर बनला. पण मार्कने त्याचा प्रोजेक्ट कॉपी केला आणि दिव्यचे फाऊंडर नाव पुसले गेले.

हा प्रोजेक्ट मार्कने कॉपी केला आणि फेसबुक फाउंडर म्हणून मार्कचे नाव जगाला माहिती पडले. हॉर्वर्ड कनेक्शन सोशल साईटच्या निर्माण प्रक्रिये दरम्यान फेसबुकचा जन्म झाला. दिव्य अनेक वर्षांपासून यावर काम करत होता. मार्क एक सहयोगी म्हणून या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाला होता. पण मार्कने फेसबुक हायजॅक केल्यानंतर त्याने डोमेन नेमही त्याच्या नावावर रजिस्टर्ड केल्यामुळे दिव्य आणि मार्क यांच्यात वाद झाले. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले.

या दरम्यान हे उघड झाले की, फेसबुकचा फाउंडर दिव्य नरेंद्र आहे. या फसवणुकीच्या बदल्यात मार्कला दंड भरावा लागला. मार्कने दंड म्हणून ६५० लाख डॉलर्स रूपये दिव्यला दिले. पण यावर दिव्य नाराज होता. त्यानंतर फेसबुक आणि दिव्य आणि आणखी लोकांमध्ये एक सेटलमेंट झाली. या सेटलमेंटनुसार दिव्य फेसबुकमध्ये त्यांना काही शेअरही देण्यात आले. अशाप्रकारे मार्क झुकरबर्गने चोरी केलेल्या प्रोजेक्टवर आज तो श्रीमंत झाला आहे.

The post एका भारतीयाची कल्पना चोरून मार्क झाला फेसबुकचा सर्वेसर्वा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *