March 12, 2017

एकाच पिस्‍तुलाने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींची हत्‍या

Written by

trio

trio
मुंबई – एकाच गावठी पिस्‍तुल्‍याने पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांचीही हत्‍या झाली असल्‍याची माहिती स्कॉटलंड लॅबने दिलेल्या अहवालातून समोर आली. तिघांच्या हत्या एकचा पिस्तुलातून झाल्याचा अहवाल यापूर्वी मुंबई फॉरेन्सिक लॅबने दिला होता.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या परवानगीने सीआयडीने या तिघांच्या हत्‍येतील सार्ध्‍यम्‍य शोधण्‍यासाठी लंडन येथील स्कॉटलंड लॅबमध्ये काही नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यानुसार एकाच पिस्तुलातून तिघांवर गोळ्या झाडल्याचा अहवाल स्कॉटलंड लॅबने दिला आहे. यापूर्वी मुंबई फॉरेन्सिक लॅबने तिघांच्या हत्या एकचा पिस्तुलातून झाल्याचा अहवाल दिला होता. या शिवाय सीआयडीने पानसरे हत्येमध्ये दोन पिस्तुल वापरल्याचा अहवाल दिला होता. त्यापैकी एक पिस्तुल इतर दोघांच्या हत्येसाठी वापरल्याचेही सीआयडीने म्हटले होते. त्यामुळे उच्‍च न्‍यायालयाच्या परवानगीने स्कॉटलंड लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. या तीनही गुन्‍ह्यासाठी आरोपींनी ७.६५ एमएमचे गावठी पिस्‍तुल वापरले. बुलेट आणि काडतुसाच्‍या फॉरेन्सिक विश्लेषणातून हे निश्चित होते, असे या अवहलात म्‍हटले आहे.

२० ऑगस्ट २०१३रोजी डॉ. दाभोलकर यांची, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी तर डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्‍ट २०१५ रोजी हत्‍या झाली. एकाच पद्धतीने या तिघांचीही हत्‍या झाली. शिवाय हे तिघेही पुरोगामी चळवळीत कार्य करत होते. त्‍यामुळे कर्मठ विचारधारेसाठी कार्य करणाऱ्या मारेकऱ्यांनी त्‍यांची हत्‍या केली, याला पुष्‍ठी मिळते. शिवाय या मागचा मुख्‍यसूत्रधारही एकच असावा हे सिद्ध होते. त्‍याच दिशेने पोलिस तपास करत आहेत.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) जून महिन्‍यात ‘सनातन’चा साधक आणि हिंदू जनजागृतीशी संबंधित संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. त्‍यापूर्वी सारंग अकोलकर अटक केली होती. अकोलकर आणि तावडे हे ई-मेलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. या शिवाय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचाच साधक समीर गायकवाड याला गत वर्षी अटक झाली.

The post एकाच पिस्‍तुलाने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींची हत्‍या appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *