March 12, 2017

उल्फाच्या सदस्यांनी केले भाजप नेत्याच्या पुत्राचे अपहरण

Written by

ulfa

ulfa
गुवाहाटी – आसाममधून युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम इंडिपेंडंट (उल्फा-आय) या बंदी असलेल्या संघटनेच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या पुत्राचे अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांनी एका व्हिडिओद्वारे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

तिनसुकिया जिल्ह्यातील पंचायत समितीचे उपाध्यक्ष रत्नास्वेर मोरण यांचा मुलगा कुलदीप मोरणचे अपहरण करण्यात आले आहे. या अपहरणाबाबत युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम इंडिपेंडंट (उल्फा-आय) या बंदी असलेल्या संघटनेच्या सदस्यांनी एक व्हिडिओ पाठविला आहे. त्यामध्ये एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

कुलदीपचे अपहरण करून त्याला नागालॅंड नॅशनल सोशलिस्ट कौन्सिलच्या सदस्यांनी उल्फा-आयच्या ताब्यात दिल्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तसेच या कटामध्ये कुलदीपचा सहभाग असण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. उल्फा-आयच्या सदस्यांनी रत्नास्वेर यांच्यासह माध्यमांना व्हॉटसऍपद्वारे एक व्हिडिओ पाठविला आहे. त्यामध्ये १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. उल्फा-आयच्या बंडखोरांना रत्नासेवर यांचे भाजपचे आमदार बोलेन चेतिया संबंध असल्याचे समजल्यानेच त्यांनी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

The post उल्फाच्या सदस्यांनी केले भाजप नेत्याच्या पुत्राचे अपहरण appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *