March 12, 2017

आर्चीला सोडून पदक विजेत्यांचेही कौतुक करा – नागराज मंजुळे

Written by

nagraj-manjule

nagraj-manjule
पुणे : आपल्या देशात ऑलिम्पिकसाठी काहीच संघटित प्रयत्न केला जात नसल्याबद्दल आश्चर्य वाटते असे मत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले आहे. लोकांना फक्त आर्ची दिसते, मात्र देशाला गौरव मिळवून देणारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक दिसत नसल्याची खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.

नागराज मंजुळे पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धा या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दुसरीकडे पुण्यातच नाना पाटेकर यांनी ऑलिम्पिकच्या अनुषंगाने, समाजमनावर भाष्य केले. दर चार वर्षांनी ऑलिम्पिक आल्यावर टीव्ही पुढे बसायचे. पदक मिळाल्यावर कौतुक करायचे आणि नाही मिळाले तर काही तरी विधान करायचे, हे चूक असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जयवंत राठी व्होकेशनल गाईडस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या पदवीप्रदान समारंभात नाना बोलत होते.

The post आर्चीला सोडून पदक विजेत्यांचेही कौतुक करा – नागराज मंजुळे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *