March 12, 2017

आयओसी सदस्यत्वाची सायनाला हुलकावणी

Written by

saina-nehwal

saina-nehwal
लॉसेनी – आयओसी सदस्यत्वाने भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला हुलकावणी दिली आहे. सायनाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या चार सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत सायनाला १२३३ मते मिळाली.

मतदानाचा हक्क २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व ऍथलिटसना देण्यात आला होता. आयओसीच्या सदस्य पदासाठी चार व्यक्तींची निवड केली जाते. जगातील पहिल्या २३ अव्वल क्रीडापटूंमध्ये सायनाचा समावेश असल्याने तिने आयओसीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढविली. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सायनाला आपल्या गटातील दुस-याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कास्यपदक मिळविले होते.

The post आयओसी सदस्यत्वाची सायनाला हुलकावणी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *