March 12, 2017

अॅपलचा ‘गुपचूप’ कारभार उघड; भारतीय तरुणांच्या कंपनीची खरेदी

Written by

apple

apple
मुंबई: अॅपलने ‘डिजिटल हेल्थ’ क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीकोनातून दोन भारतीय वंशीयांची कंपनी खरेदी केली असून आरोग्याशी संबंधित आकड्यांची नोंद ठेवणारी स्टार्टअप ‘ग्लिंप्स’ ही कंपनी कोणताही गाजावाजा न करता अॅपलने खरेदी केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या कंपनीचा खरेदी व्यवहार नुकताच झाला असून याची घोषणा करण्यात आलेली नाही.

यासंबंधात अॅपलचे प्रवक्ते म्हणाले की, वेळोवेळी लघु उद्योगांना खरेदी करून कंपनी आपला व्यवसाय वाढवते. सर्वसाधारणपणे आमचा उद्देश आणि योजनासंबंधीत चर्चा करत नाही. अनिल सेठी आणि कार्तिक हरिहरन यांनी २००३ साली ‘ग्लिंप्स’ ही कंपनी सुरु केली. ही कंपनी ग्राहकांसाठी मेडिकल रेकॉर्ड ठेवणे आणि त्यासंबंधी सर्व माहिती पुरवणे आदी सुविधा पुरवते.

गेल्या काही महिन्यांमध्ये अॅपलने मोबाईलच्या माध्यमातून रुग्ण, डॉक्टर आणि संशोधकांसाठी आरोग्याशी संबंधित आकडे उपलब्ध करुन देणारे लघु उद्योग खरेदी केले आहेत. यात हेल्थ किट, केअर किट आणि रिसर्च किट आदींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. अॅपलने आपल्या आयफोन 6 वर हेल्थ किट अॅप ही उपलब्ध करुन दिले आहे. हे अॅप यूजर्सना स्वास्थ आणि फिटनेससंबंधी वैयक्तीक आकड्यांचे निरिक्षण उपलब्ध करून देते.

The post अॅपलचा ‘गुपचूप’ कारभार उघड; भारतीय तरुणांच्या कंपनीची खरेदी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *