March 12, 2017

अरूणाचल प्रदेशमध्ये तैनात झाले ब्राम्होस; चीनची टरकली

Written by

brahmos

brahmos
नवी दिल्ली : सतत आंतराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत अधून मधून भारतीय हद्दीत घुसघोरी करणाऱ्या चीनला यावेळी भारताने भक्कम संदेश दिला असून अरूणाचल प्रदेशमध्ये भारताने ब्राम्होस क्षेपणास्त्र तैनात केले आहे. चीनचा भारताच्या या निर्णयामुळे चांगलाच तिळपापड झाला असून, काही अंशी चीन घाबरलाही आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्रामुळे पूर्वेत्तर सीमा भागात याचा नकारात्मक प्रभाव पडेल, असेही चीनने म्हटले आहे.

दरम्यान, चीननेही नेहमीप्रमाणे भारताच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत भारताचा हा निर्णय आम्हाला प्रत्यत्तर द्यायला भाग पाडू शकतो, असे म्हटले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पीएलए डेलीने ही प्रतिक्रिया दिली आहे. पीएलए ही चीन आर्मीची अधिकृत मीडिया एजन्सी आहे. पीएलएच्या माध्यमातून चीन आपली लष्करी किंवा त्यासंबंधीची भूमिका मांडत असतो. दरम्यान, भारताने तैनात केल्याला ब्राम्होसच्या टप्प्यात तिबेट आणि यूनान प्रांत आला आहे. भारताचा हा निर्णय चीनच्या फारच जिव्हारी लागला असून, भारताने तिबेट आणि जिनजियांग भागामध्ये विमानतळ, रस्ते, रेल्वे सुविधांमुळे उभारल्याचा दावाही पीएलए डेलीने केला आहे.

The post अरूणाचल प्रदेशमध्ये तैनात झाले ब्राम्होस; चीनची टरकली appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *