March 12, 2017

अब्दुल्लांच्या पूर्व पत्नीची सरकारी बंगल्यातून हकालपट्टी

Written by

omar-abdullha

omar-abdullha
नवी दिल्ली : सरकारी बंगल्यातून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची पूर्व पत्नी पायल अब्दुल्ला यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचे सामान जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले आहे.

दिल्लीतील ७, अकबर परिसरातील हा सरकारी बंगला ओमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री असताना देण्यात आला होता. मात्र, अनेक वर्षांपासून या बंगल्यात स्वतः ओमर अब्दुल्ला राहत नाहीत. पण सुरक्षेचे कारण देत पायल अब्दुल्ला आपल्या दोन मुलांसह या बंगल्यात राहत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने निवासस्थान रिकामा करण्याचे आदेश देऊनही पायल यांनी बंगला सोडले नाही.

दरम्यान, न्यायमूर्ती इंदरमित कौर यांच्या आदेशानंतर पोलिसांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केले. त्यानंतर त्यांचे सामान बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना व त्यांच्या मुलांना दिल्ली पोलिसांकडून झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात येणार असल्याचे कौर यांनी स्पष्ट केले.

The post अब्दुल्लांच्या पूर्व पत्नीची सरकारी बंगल्यातून हकालपट्टी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *