Bokya Satbande Marathi Blog

Marathi Kavita Marathi lekh Sangrah

हातखर्च

Original link http://maharashtratimes.indiatimes.com

जागांचे भाडे ठरविण्यासाठी समिती

आगामी सिंहस्थासाठी विविध कारणांसाठी लागणाऱ्या तात्पुरत्या स्वरुपाच्या जमिनींचे दर ठरविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने ठरविलेले दर आकारून या जमिनींचे अधिग्रहण केले जाणार आहे.

बोगस मतदानाला यंदा चाप!

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये बोगस मतदानाला आळा बसण्याची दाट शक्यता आहे. मतदारांचे फोटो मतदार यादीत असण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर गेल्याने ही बाब शक्य होणार आहे. मतदार यादीत फोटो असण्याचे प्रमाण निफाडमध्ये सर्वाधिक तर नाशिक मध्यमध्ये सर्वात कमी आहे.

गोदाम आगीत भस्मसात

हुंडीवाला लेनमधील हिरा होजिअरी या दुकानाच्या गुदामात लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे कपडे जळून खाक झाले. जिल्हाभरातील छोटे व्यावसायिक या दुकानातून माल घेऊन जातात.

…तर विजय निश्चित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास विधानसभा निवडणुकीत मनसेला निश्चित भरघोस यश मिळेल, असे प्रतिपादन आमदार वसंत गिते यांनी केले.

पर्वतावर फुलली कारवी

दुर्मीळ वनस्पती अन् वनौषधींचा खजिना असलेल्या अंजनेरी पर्वतावर सध्या आयुर्वेदिक उपयोगाच्या कारवी वनस्पतीचा बहर आला आहे. या वनस्पतीचे वैशिष्ट्ये म्हणजे तिला आयुष्यात एकदाच आणि तेही सात वर्षानंतर फुल येते.

डॉ. अशोक केळकर यांचे निधन

माणसाला माणसांशी जोडणाऱ्या भाषेचा मूलगामी अभ्यास करणारे ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक डॉ. अशोक रामचंद्र केळकर (वय ८५) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले. भाषाशास्त्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना साहित्य अकादमी, पद्मश्री आदी सन्मानांनी गौरविण्यात आले.

भोंदूबाबा गजाआड

पैशांचा पाऊस पडतो, अशी आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबा साहेबखान यासिन खान पठाण उर्फ हकीमबाबा याला साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सूल भागातून जेरबंद केले. या भोंदूबाबा विरोधात आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेत्यांवर पितृपक्ष भारी

जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी उमदेवारी अर्ज भरण्यास शनिवारपासून (२० सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी केवळ एक अर्ज दाखल झाला असून तो पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहे.

पुरवणी मतदार यादी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १७ सप्टेबरपर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या मोहिमेत नाव नोंदणी केलेल्या मतदारांना यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी चौथी पुरवणी मतदार यादी २७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Previous Posts